मुंबई: दिवाळीचा सण एका दिवसावर येऊन ठेपला आहे. दिवाळी विविध पक्वानांची रेलचेल असते. मिठाई बनवली जाते. दिव्यांची आरास, रोषणाई केली जाते. सगळीकडे आनंदीआनंद असतो. ३१ ऑक्टोबरला संपूर्ण देशात दिवाळसणाचा खऱ्या अर्थाने सुरूवात होते आहे.
दिवाळीला लोक जे पदार्थ बनवतात तसेच घरामध्ये गोड पदार्थ बनवले जातात त्यावेळेस तुपाचा वापर केला जातो. मात्र दिवाळीच्या निमित्ताने अनेक दुकानांमध्ये भेसळयुक्त तूप विकले जाते. दिवाळीला तुपाची मागणी अधिक असते. यामुळे अधिक फायदा मिळवण्यासाठी दुकानदार भेसळयुक्त तूप विकतात.
भेसळयुक्त तुपाचा वापर केल्याने पदार्थांना चव येत नाहीच मात्र आरोग्यावर वाईट परिणाम होतो. भेसळयुक्त तुपामुळे तुमची तब्येतही खराब होऊ शकते. यामुळे तुम्ही जेव्हा बाजारात जाल तेव्हा जे तूप खरेदी करत आहात ते खरे आहे की खोटे याची तपासणी करा. खऱ्या तुपामध्ये छोटे छोटे दाण असतात. भेसळयुक्त तुपामध्ये असे नसते.
यासोबत तुम्हाला तूप गरम केल्यानंतरही त्याची तपासणी करता येते. यासाठी थोडे तूप घ्या ते गरम करा तर तूप लगेचच विरघळले आणि त्याचा रंग थोडासा तपकिरीसारखा झाला तर ते तूप खरे आहे. मात्र तूप वितळल्यासाठी वेळ घेत असेल आणि त्याचा रंग पिवळा झाल्यास त्यात भेसळ आहे.
याशिवाय तुम्ही आयोडिनने त्याची तपासणी करू शकता. यासाठी थोड्याशा तुपामध्ये आयोडिनचे काही थेंब टाका. जर तूप शुद्ध असेल तर त्यात कोणताही बदल होणार नाही मात्र जर तुपामध्ये भेसळ असेल तर त्याचा रंग व्हॉयलेट अथवा वांगी कलर होईल.