Sunday, December 15, 2024
HomeदेशCensus To Start In 2025 : आता जनगणनेचे चक्र बदलणार, २०२५ पासून...

Census To Start In 2025 : आता जनगणनेचे चक्र बदलणार, २०२५ पासून सुरु होणार जनगणना

आता देशात जनगणनेस सुरुवात होणार आहे. मात्र जनगणनेचे चक्र बदलणार आहे. नेहमी दहा वर्षांनी होणारी जनगणना यंदा १४ वर्षांनी होणार आहे. जनगणना २०११ नंतर आता २०२५ मध्ये होणार असून त्यानंतर २०३५, २०४५, २०५५ अशी पुन्हा दहा, दहा वर्षांनी जनगणना होणार आहे. यापूर्वी १९९१, २००१, २०११ अशी जनगणना झाली होती. आता २०२५ मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये संप्रदायाची माहिती घेतली जाणार आहे. २०२५ मध्ये सुरु होणार जनगणना २०२६ पर्यंत चालू राहणार आहे. कोरोनामुळे २०२१ मध्ये जनगणना झाली नव्हती. परंतु या जनगणनेत जातीय जनगणना होणार का? यासंदर्भात कोणताही खुलासा अजून झालेला नाही.

जातीय जनगणनेची अनेक विरोधी पक्षांकडून मागणी होत आहे. सरकारने मात्र याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. धर्म आणि वर्ग जनगणनेत विचारले जातात. सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जमातीची गणना केली जाते. लोकांना या वेळी ते कोणत्या पंथाचे अनुयायी आहेत हे देखील विचारले जाऊ शकते.

आतापर्यंत जनगणनेत धर्म आणि वर्ग विचारला जात होता. सामन्यपणे अनुसूचित जाती आणि जनजातीची गणना केली जात होती. मात्र यंदा संप्रदाय विचारला जाणार आहे. कर्नाटकात जसे सामान्य वर्गात असलेले लिंगायत समाज स्वत: वेगळा संप्रदाय मानतात. तसेच अनुसूचित जातीत वाल्मीकी, रविदासी सारखा संप्रदाय आहे. म्हणजेच आता धर्म, वर्ग सोबत संप्रदाय गणनेचा आधार असणार आहे. सरकारचा त्याबाबत विचार सुरु आहे.

जातीय जनगणना होणार का?

जनगणना पूर्ण झाल्यानंतर २०२६ मध्ये लोकसभेच्या जागांचे सीमांकन सुरू होणार आहे. त्यानंतर हे काम २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष आणि एनडीएमधील काही पक्षांनी जातीय जनगणनेची मागणीसुद्धा केली आहे. मात्र केंद्र सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही.

जनगणनेचा इतिहास

१८७२ मध्ये भारतातील पहिली जनगणना गव्हर्नर-जनरल लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली होती. १८८१ मध्ये भारताची पहिली संपूर्ण जनगणना आयुक्त डब्ल्यू.सी. प्लॉडेन यांनी केली होती. त्यानंतर हे दर १० वर्षांनी एकदा जनगणना होत आली. मात्र, त्यातही काही वेळा अंतर दिसून आले.

१८७२
१८८१
१८९१
१९०१
१९११
१९२१
१९३१
१९४१

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५१ मध्ये पहिली जनगणना झाली.

१९५१
१९६१
१९७१
१९९१
२००१
२०११

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -