Wednesday, December 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजयंदाच्या निवडणुकीत अपक्ष ठरणार गेमचेंजर

यंदाच्या निवडणुकीत अपक्ष ठरणार गेमचेंजर

अल्पेश म्हात्रे

मुंबई : यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने निवडणुकीत काय होईल ते अजूनही सांगता येणे कठीण आहे . मोठमोठ्या पक्षाची झालेली शकले व त्यातून निर्माण झालेल्या अधिक संधी मात्र तरीही बंडखोरांची  चिंता ही सर्वच पक्षांना जाणवू लागली आहे.त्यामुळे जर बंडखोरांमुळे मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले तर अपक्ष म्हणून लढणारे बंडखोरांना प्रचंड महत्व प्राप्त होऊ शकेल.

जर मंगळवार ४ नोव्हेंबरपर्यंत तिकीट माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत जर या बंडखोरांना थोपवण्यात अपयश आले  नाही, तर मात्र सर्वच पक्षांना या बंडखोरांचा ताप निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन होईल किंवा दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. १९९५ साली महाराष्ट्राच्या राजकारणात अशाच पद्धतीने बंडखोरी होऊन मोठ्या प्रमाणात अपक्ष निवडून आले होते. त्यामुळे १९९५ ची पुनरावृत्ती आता होईल का? की, सुजाण नागरिक मतदान करताना योग्य उमेदवार निवडून देतील हे येणारा काळच ठरवेल.

यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे फुटून दोन शिवसेना झाल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फुटून दोन पक्ष निर्माण झाले आहेत. त्यामुळे सहा ते सात मोठे मोठे पक्ष ही निवडणूक लढवत आहे. पक्षांची संख्या वाढल्याने इच्छुकांची संख्या वाढली असून एका पक्षाकडून उमेदवारी न दिल्यास दुसऱ्या पक्षाकडे उमेदवार जात आहेत. मात्र,तेथूनही उमेदवारी न मिळाल्यास थेट अपक्ष म्हणून उभे राहून मते कशी खाता येतील हे पहिले जाते. तसेच,समोरच्या पक्षाला नामोहरण करण्यासाठी आयारामांची चलती जोरात सुरू असून आयारामांना तिकीट लवकर दिले जात आहे. त्यामुळे मूळ ज्याचा दावा असतो. त्याचे खच्चीकरण होऊन तो अपक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे.

यंदाची निवडणूक २८८ जागांसाठी होणार आहे. आपल्याच मूळ पक्षाकडून तिकीट नाकारल्याने बऱ्याच उमेदवारांनी आपल्या पक्षाविरोधात बंड केले आहे त्यामुळे अशा मंडळांना शांत करण्याचे प्रयत्न सर्वच पक्षांकडून मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यातच अशा परिस्थितीमुळे यंदा त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास मात्र अपक्षांची चांगली चलती होणार आहे. त्यातच विविध पक्षांकडून ज्याच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री अशी असल्यामुळे समोरच्या व आपल्याच घटक पक्ष असणाऱ्या उमेदवारांना पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल व त्यामुळेही जिंकलेले अपक्ष गेमचेंजर ठरतील असे जाणकार सांगतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -