Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीविधानसभा निवडणुकीसाठी आठ नगरसेवक; तर आधीच्या कार्यकाळातील पाच नगरसेवकांचा समावेश

विधानसभा निवडणुकीसाठी आठ नगरसेवक; तर आधीच्या कार्यकाळातील पाच नगरसेवकांचा समावेश

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात आठ नगरसेवक आपले नशीब आजमावणार आहेत. २०१७ च्या कार्यकाळातील आठ नगरसेवक आणि त्याआधीच्या कार्यकाळातील पाच नगरसेवक यंदा निवडणुकीत उभे राहणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील ३६ मतदारसंघांसाठी आतापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ च्या कार्यकाळातील आठ नगरसेवक निवडणूकीसाठी उभे राहणार आहेत. आधीच्या कार्यकाळातील मिळून डझनभर माजी नगरसेवक निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे सर्वाधिक माजी नगरसेवक असून त्यात श्रद्धा जाधव (वडाळा), अनंत नर (जोगेश्वरी पूर्व), प्रवीणा मोरजकर (कुर्ला), मनोज जामसुतकर (भायखळा), समीर देसाई (गोरेगाव), उदेश पाटेकर (मागाठाणे) यांचा समावेश आहे. तर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी वर्सोवामधून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार)च्या राखी जाधव (घाटकोपर पूर्व), महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे (वरळी), स्नेहल जाधव (वडाळा), भाजपचे विनोद शेलार (मालाड पश्चिम), कॉंग्रेसमधून आसिफ झकेरिया (वांद्रे पश्चिम), शिवसेना (शिंदे) मुरजी पटेल (अंधेरी पूर्व), सुवर्णा करंजे (विक्रोळी) या नगरसेवकांचा समावेश आहे.

गेल्या विधानसभा निवडणूकीत २०१९ मध्ये चार नगरसेवक आमदार बनले होते. त्यामध्ये यामिनी जाधव (भायखळा), दिलीप लांडे (चांदिवली), रमेश कोरगावकर (भांडूप), पराग शाह (घाटकोपर पूर्व) यांचा समावेश होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -