संगमनेर : डॉ. जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्यावर घाणेरड्या शब्दात टीकाटिप्पणी केल्यानंतर संगमनेर मध्ये उद्रेक झाला, या उद्रेकाला आधार धरून संगमनेर मध्ये मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांच्या बगलबच्चांनी संगमनेर मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला आहे.
डॉ. जयश्री हिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, तिला पाठबळ देणाऱ्या कार्यकर्त्यांवर सर्रास खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे, यातील अनेक कार्यकर्ते तर घटनेच्या वेळी संगमनेर मध्ये सुद्धा नव्हते.
कहर म्हणजे ज्या डॉ. जयश्री थोरात यांच्या बद्दल घाणेरड्या शब्दात टीकाटिप्पणी झाली, रात्रभर कार्यकर्त्यांनी जागून पोलीस स्टेशनमध्ये ठिया दिला तेव्हा कुठे आठ तासानंतर गुन्हे दाखल झाले. आता तिला न्याय द्यायचा सोडून तिच्यावरच जमावबंदीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.