साप्ताहिक राशिभविष्य, २७ ऑक्टो ते २ नोव्हेंबर २०२४
चांगली फळे मिळतीलमेष :अनुकूल ग्रहमान असल्यामुळे शुभ ग्रहांच्या योगातून चांगली फळे मिळतील; परंतु सकारात्मक राहणे महत्त्वाचे ठरेल. भूतकाळामध्ये जास्ती गुंतून न पडता वर्तमान काळाचा विचार करणे आवश्यक ठरेल. कार्यमग्न राहणे फायदेशीर ठरेल. काही जुन्या आठवणी पुसून टाकाव्या लागतील. गतिमान घटना घडतील, प्रवासाचे योग आहेत. कुटुंबातील तरुण-तरुणींचा भाग्योदय होऊ शकतो. व्यावसायिक वसुली होईल. जुनी येणी वसूल होतील. नोकरीचा शोध संपून नोकरी मिळेल. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखतीमधून बोलावणे येईल. विद्यार्थ्यांनी वेळ घालवू नये. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. |
|
सकारात्मक बदलांचा चांगला उपयोगवृषभ : व्यवसाय धंद्यात पूर्वी केलेले नियोजन यशस्वी होताना दिसेल. सकारात्मक बदलांचा चांगला उपयोग व्यवसायात झालेला दिसून येईल. व्यवसायातील उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाणही वाढेल, मात्र उधारी-उसनवारी नको. कामगारांच्या प्रश्नाकडे बघताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. कुटुंबातील सदस्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रेमिकांना प्रेमात यश मिळू शकते. मनासारख्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना आपल्या उच्च शिक्षणाविषयी नियोजन करण्याची संधी मिळेल. नवीन कामे मिळतील. जवळच्या तसेच दूरच्या अंतराचे प्रवासाचे नियोजन करू शकाल. धनलाभ होईल. उपासनेला दृढ चालवावे. शुभवार्ता मिळतील. |
|
वातावरण आनंदी आणि उत्साही राहीलमिथुन : कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींकडून त्यांच्या प्रगतीपर शुभवार्ता मिळाल्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. कुटुंबातील वादविवाद मिटतील. भावा-बहिणीबद्दल प्रेम वाटेल. घरातील वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यावसायिक जुनी येणी वसूल झाल्यामुळे अर्थभान समाधानकारक राहील. मनासारखा खर्च करू शकाल. विवाहविषयक बोलण्यामध्ये प्रगती होईल. परदेशगमनाचे नियोजन करू शकाल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मार्ग प्रशस्त होतील. नोकरीच्या ठिकाणी समाधानकारक वातावरण राहील. राजकारणापासून दूर राहा. |
|
प्रयत्न आवश्यक आहेतकर्क : आपल्या व आपल्या जीवनसाथीच्या मनातील बरेच दिवस घोळत असलेले स्वतःच्या घराविषयीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकते मात्र त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आवश्यक आहेत. पैशाची सोय होईल. स्वतःच्या मालकीच्या घरात गृहप्रवेश करण्याचे योग आहेत. त्याचप्रमाणे व्यवसाय करत असलेली जागा सुद्धा स्वतःच्या मालकीची होऊ शकते. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती उत्तम राहील. व्यवसायातील नवीन योजनांचा फायदा मिळू शकेल. बदलत्या परिस्थितीबरोबर आपण स्वतः ही बदलणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींबद्दल आदरयुक्त भावना राहील. मंगल कार्य ठरतील. |
|
हेतू सिद्ध होतीलसिंह :दीर्घकालीन प्रलंबित असलेली कामे या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्याचा फायदा घेऊन महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेण्याच्या प्रयत्नात कमी पडू नका. आपले हेतू सिद्ध होतील. महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल. बुद्धिजीवी मंडळींना हा कालावधी अत्यंत अनुकूल आहे. साहित्य क्षेत्रातील जातक व कलाकार यांना प्रसिद्धी मिळून अर्थार्जन उंचावेल. नवीन कामे मिळतील. परदेशगमनाचे योग. विद्यार्थ्यांना घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. आरोग्य चांगले राहून आपल्या पुढील कामे वेगाने कराल. शुभवार्ता मिळतील. |
|
मान्यवरांच्या गाठीभेटीकन्या : या सप्ताहात समाजातील मान्यवरांच्या गाठीभेटी होतीलच; परंतु आपल्या जनसंपर्कात वृद्धी होईल. मान्यवरांच्या गाठीभेटीतून, सहवासातून आपली कामे पूर्ण करून घ्या. त्याचप्रमाणे मार्गदर्शनही मिळेल. सामाजिक पतप्रतिष्ठा मिळेल. निरनिराळ्या कार्यक्रमांचे बोलावणे येतील. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होईल. कुटुंबातील सदस्यांचे अपेक्षित सहकार्य वेळोवेळी मिळत राहील. व्यवसायात तेजी जाणवेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहिल्याने समाधानकारक राहाल. |
|
चिंता मिटतीलतूळ :आपल्या छंद आणि उपक्रमातून या आठवड्यात आपल्याला अनपेक्षित यश मिळू शकते. जे नोकरीच्या शोधार्थ आहेत, अशांचा नोकरीविषयक शोध संपून नवीन नोकरी मिळू शकेल. बेरोजगारांना रोजगार मिळू शकेल. नवीन मिळणारी ती नोकरी स्वीकारा. शैक्षणिक चिंता मिटेल. व्यवसाय धंद्यात प्रसन्नता लाभेल. काही वेळेस महत्त्वाचे करारमदार होऊन अपवादात्मक मोठे लाभ होऊ शकतात. सरकारी स्वरूपाची कामे मिळतील. काहींना ओळखीतून विवाह प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. प्रेमाचे विवाहात रूपांतर होऊ शकते. विद्यार्थ्यांनी कुसंगतीपासून अलिप्त राहावे. |
|
दैवी प्रचिती मिळू शकतेवृश्चिक : सप्ताहातील परिस्थिती काही वेळेस नाजूक राहू शकते. स्वतःचे विचार स्थिर ठेवण्याची गरज आहे. इतरांच्या बोलण्यात फारशी येता कामा नये. सावध राहावे. ती परिस्थिती सांभाळावी कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका. नोकरी बदलण्याचे अथवा सोडण्याचे विचार तत्काळ रद्द करा. वाईट परिस्थिती कायम राहत नसते हे लक्षात ठेवा. ताणतणावापासून दूर राहा. व्यवसायात कर्जविषयक कामे होतील. थोरामोठ्यांचे सहकार्य मिळवून आपल्या योजना कार्यान्वित करू शकाल. दैवी प्रचिती मिळू शकते. उपासनेला दृढ चालवावे. |
|
नावीन्यपूर्ण घटनाधनु :सदरील कालावधीमध्ये नावीन्यपूर्ण घटना घडून आपले रोजचे जीवन बदलू शकेल. त्याचप्रमाणे पूर्व सुकृतामुळे शुभ फळे मिळतील. आपले रोजचे जीवन बदलू शकते. वाढवडिलांचे आशीर्वाद फलद्रूप होताना अनुभवता येईल. काही महत्त्वाच्या बाबतीत नावीन्यपूर्ण घटना घडल्यामुळे आश्चर्य वाटेल. तरुण-तरुणींची नोकरी बाबतची प्रतीक्षा संपुष्टात येईल. तसेच प्रेमात यश मिळू शकेल पण पुढील पाऊल टाकताना पूर्ण विचारांती पाऊल टाकावे. कार्यमग्न राहण्याची गरज. |
|
मार्गदर्शन मिळेलमकर : महत्त्वाच्या बाबींमध्ये अनुकूलता लाभल्याने आत्मविश्वास वाढेल. आपल्यापुढील कामे उत्साह आणि गतीने पूर्ण करू शकाल. कामात एक प्रकारचा वेग येईल. पूर्वी घेतलेल्या कष्टांचे फळ मिळू शकते. समाजातील गुरुतुल्य व मान्यवर व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. वेळप्रसंगी मदतसुद्धा मिळू शकते. पण थोडे विनयशील राहण्याची गरज आहे. आपल्या मतांवर व विचारांवर नियंत्रण गरजेचे आहे. कुटुंबातील परिस्थिती समाधानकारक असली तरी काही वेळेस वाद-विवाद घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो लहान-सहान गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करणे हितकारक ठरेल. |
|
प्रलंबित कामे गतिमान होतीलकुंभ :आपल्या बुद्धिचातुर्याने व व्यवहार कौशल्याने आपण आपली महत्त्वाची कामे पूर्ण करू शकता. दीर्घकालीन प्रलंबित कामे गतिमान होतील. व्यवसाय मनासारखा होण्यासाठी काही दिवस वाट बघावी लागणार आहे. त्यासाठी काही सकारात्मक आणि पूरक बदल करणे क्रमप्राप्त ठरेल. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरा. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती उत्तम राहील. आर्थिक मदत मिळू शकते. कुटुंबातील एखादी महत्त्वाची समस्या सुटेल. वाद-विवाद शमतील. एकमेकांना समजावून घेण्याची भावना निर्माण होईल. नोकरीतील परिस्थिती उत्तम राहून वेतन वृद्धी व पदोन्नतीचे योग आहेत. जवळच्या तसेच दूरच्या अंतराचे प्रवासाचे नियोजन करू शकाल. धनलाभ होईल. |
|
परदेशगमनाचे योगमीन : सध्याच्या परिस्थितीतील प्रश्न जे बरेच दिवस सुटण्याची आपण वाट बघत होता ते आता सुटतील. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुद्धा मार्गी लागतील. त्यांच्या मंगलकार्याविषयी व नोकरीविषयक प्रश्न सुटण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत. ओळखीतून अथवा मध्यस्थी करून त्यांचा नोकरीविषयक प्रश्न सुटेल. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करावयास मिळाल्यामुळे आनंद वाटेल. व्यवसायात कर्जविषयक कामे होतील. कलाकार खेळाडू यांना बरेच दिवसांनी त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. परदेशगमनाचे योग आहेत. आत्मविश्वासाने प्रसंगाला सामोरे जा. |