पूर्णिमा शिंदे
आज प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे असलेले, समाजात वावरताना आपली भूमिका मांडताना काय हवे असते? तर आत्मविश्वास, धाडस, शक्ती यासाठी हवे भाषण कला. बोलताना देहबोली, हावभाव, शब्दांतील चढ-उतार, शब्दोच्चार, शब्द भांडार विपुल हवे. मनात असलेल्या भावना व्यक्त करणे, आवाजातील रोहरोह, शब्दावरील जोर, आवाजाची पट्टी, आपल्या मनाशी असलेल्या भावना व्यक्त करणे यांसह अनेक गोष्टी व्यक्त होणे गरजेचे अाहे. त्यापैकी पुढीलप्रमाणे शब्दातून भाषा, भाषाशैली, साहित्य आणि आवाजाचा पोत, आवाजाची पट्टी आणि व्यक्त होण्यासाठी संवाद अत्यंत मोलाचे आहे. बोलणे हे सुरेख करण्यासाठी आवाजाची काळजी घेता आली पाहिजे. जसे शरीर महत्त्वाचे आहे, तितकेच मनसुद्धा. शरीर कमवावे तसे आवाजही कमावता येतो. यासाठी काही योजना, तंत्र अभ्यास असतात. कला आहे, साधना आहे. आपल्या दिनक्रमामध्ये त्याचाही सराव किंवा रियाज व्हायला हवा. व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी आपले भाषा भाषेतील शब्द, शब्दातील माधुर्य महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच आवाज उत्तम असला पाहिजे. तसेच आवाज कमावता आला पाहिजे. आपल्या आवाजाला आपण सांभाळू शकतो आहे. त्यापेक्षा चांगले घडवू शकतो. साचेबद्ध सुरेल जादुई किमया करू शकतो. यातही सराव महत्त्वाचा आहे. मोठमोठे दिग्गज गायकसुद्धा पहाटे उठून रियाज, सराव करतात. आपली जीभ, घसा, कंठ वळणदार स्वच्छ आणि अभ्यासपूर्ण असावेत. यासाठी श्वासाचे व्यायाम करावेत. दमछाक व्यायाम आहेत. त्यानंतर जिभेला जसा खाण्यापिण्याचा निर्बंध असावे. तेल, तिखट, मसालेदार खाऊ नये. शरीर व मन यांचे संतुलन, व्यायाम, आहार, निद्रा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शारीरिक हालचाली सुद्धा कोठे? काय? कसे? किती? बोलावे. याचेही अभ्यासपूर्व नियम, निर्बंध, संकल्प, साचेबद्ध, संकलन असावे. सुचत नसेल, तर अभ्यासपूर्ण स्वतः संहिता लिहून ठेवणे गरजेचे आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकर्षक असेच बोलावे. प्रसंगाचे भान सादरीकरण करताना लक्षात ठेवावे. प्रसंगानुरूप बोलावे. संदर्भ द्यावे संदर्भ सोडून विषय भरकटणारे बोलू नये. सर्वांना, श्रोत्यांना ऐकत राहावेसे वाटेल असेच बोलावे. आपण बोलताना समोरच्याला कधीही कंटाळा, जांभया येऊ नये याची दक्षता घ्यावी. त्यामुळे आपल्या आवाजामध्ये माधुर, रसाळता असावी. वाणीमध्ये तितकेच महत्त्वाचे आहे. मनातले साचलेपण, साठलेलं बोललं की मन हलके होते. मनोविकारांपासून माणूस लांब राहतो. मानसोपचारतज्ञ सुद्धा पहिले बोलायला लावतात. मन दुर्बल होऊ नये. म्हणून वाणी आणि बुद्धीने श्रेष्ठ ठरलेला माणूस बोलायला लागतो. तो बोलला तरच खऱ्या अर्थाने जगू शकतो. कारण आपल्या भावनांतून आपले म्हणणे आपल्याला काय वाटते ते मांडू शकतो असे मनोविज्ञान सांगते. खूप काही सांगायचे असते.
येतंय खूप, पण बोलायला जमत नाही! असे काहीसे असतात. हसं होऊ नये. बोलताना घाम फुटतो. थरथर काप, उभे राहिले की चक्कर येते. असे काही असतात पण यांची भीती घालविण्याचे महत्त्वाचे तंत्र या बोलण्याच्या अभ्यासामध्ये आहे. संवाद कला, वक्तृत्वाला भावनेचा आत्मा म्हटले आहे. वक्तृत्व म्हणजे वाक्यचातुर्य वाक म्हणजे वाणी. वाचन, श्रवण भाषण, लेखन, अवलोकन आत्मसात करावे. जेणेकरून आपल्याला सोप्या, सहज, सुंदर भाषेत बोलता आले पाहिजे. आपले म्हणणे पटवून देता यावे. आपले मत व निर्णय मांडता आले पाहिजे. आपल्याला काय वाटतं? हे शब्दांत सांगताना शब्द भांडार विपुल हवे. वाचन सखोल हवे आणि सादरीकरण उत्तम व्हावे. चारचौघांत, आजच्या युगात महत्त्वाचा गुण आहे “भाषण”. व्यक्तिमत्त्व विकासाचे अविभाज्य घटक म्हणून सुरेख बोलायला शिका. अगदी मुलाखती, रंगमंच, राजकारण शैक्षणिक औद्योगिक सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रे. प्रसारमाध्यमे, शाळा, कोर्ट, संस्था, रुग्णालय, कॉर्पोरेट युग अशा प्रत्येक ठिकाणी बोलणे महत्त्वाचे आहे आणि तेही सुरेख.