Thursday, October 23, 2025
Happy Diwali

मेट्रोच्या कामानिमित्त बाणेर रस्ता परिसरात वाहतूक बदल

मेट्रोच्या कामानिमित्त बाणेर रस्ता परिसरात वाहतूक बदल
पुणे: शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या कामानिमित्त बाणेर रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. मेट्रो मार्गिकेच्या कामानिमित्त बाणेर रस्त्यावरील माऊली पेट्रोल पंप ते महाबळेश्वर चौक दरम्यान कामे करण्यात येणार आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून या भागतील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. उद्या सकाळी सहापर्यंत या भागातील पल्लोड फार्म ते विधाते चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ताम्हाणे चौक ते कपिल मल्हार चौक बाणेर रस्त्यापर्यंत सर्व प्रकारच्या वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >