मुंबई : प्रत्येक ग्रहाचे ठराविक काळानंतर राशीत परिवर्तन होते. याचा प्रभाव काही राशींवर शुभ ठरतो तर काही अशुभ. अशातच दिवाळीनंतर सूर्य राशी परिवर्तन करणार आहे. याचा काही राशींना फायदा होणार आहे. पाहा कोणत्या आहेत त्या राशी.
ज्योतिषशास्त्राने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीनंतर १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी सूर्य तूळ राशीत निघून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. हा काळ 3 राशींसाठी शुभ असणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांना या काळात धनलाभाचे योग मिळणार आहेत. तसेच अनेक काळापासून रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. व्यापारी वर्गातील लोकांना या काळात चांगली डील मिळेल. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. दांपत्य जीवन सुखी राहील.
सिंह रास (Leo Horoscope)
या काळात सिंह राशीतील जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. गुंतवणूकदारांचा तसाच व्यापारी वर्गाचा व्यवसाय वाढेल. या राशीच्या लोकांना मित्राचा चांगला सहभाग मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांची या काळात आर्थिक तंगीपासून सुटका होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग देखील सुरू होणार आहेत.
आरोग्यातही चांगली सुधारणा होईल.