सांज ये गोकुळी, सावळी सावळी
सावळ्याची जणू साऊली
धूळ उडवित गाई निघाल्या
शामरंगात वाटा बुडाल्या
परतती त्या सवे, पाखरांचे थवे
पैल घंटा घुमे राऊळी
पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले चांदणे सावळे
भोवती सावळ्या चाहुली
माऊली सांज, अंधार पान्हा
विश्व सारे जण होय कान्हा
मंद वाऱ्यावरी वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी
गीत: सुधीर मोघे
स्वर: आशा भोसले
माझे माहेर पंढरी
माझे माहेर पंढरी ।
आहे भिवरेच्या तीरी ॥१॥
बाप आणि आई
माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥
पुंडलीक राहे बंधू ।
त्याची ख्याती काय सांगू ॥३॥
माझी बहीण चंद्रभागा ।
करीतसे पापभंगा ॥४॥
एका जनार्दनी शरण ।
करी माहेरची आठवण ॥५॥
गीत: संत एकनाथ
स्वराविष्कार: पं. भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर