Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीआधी केली आईची हत्या नंतर आत्महत्येचा प्रयत्न, मुंबईतील धक्कादायक घटना

आधी केली आईची हत्या नंतर आत्महत्येचा प्रयत्न, मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वरळी भागातील एका मुलाने आपल्या आईची हत्या केली आणि त्यानंतर आपल्या हाताची नस कापत आत्महत्येचा प्रयत्न केला.

वरळी येथे राहणारे ५० वर्षीय बालसुब्रमण्यम कृपास्वामी मुंबईत आपली पत्नी आणि मुलीसह राहत होते. कधी कधी ते त्याच भागात राहणाऱ्या आपल्या आईला भेटायला येत असतं. २६ ऑक्टोबरला शनिवारी दुपारीही बालसुब्रमण्यम आपल्या आईला भेटायला गेले. त्यानंतर उशीने तोंड दाबून त्यांनी तिची हत्या केली. त्यानंतर हाताची नस कापली.

काय लिहिले सुसाईड नोटमध्ये

बालासुब्रमण्यम यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहिले. यात त्यांनी कर्जामुळे बेजार झाल्याने हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिले की माझ्याकडे कोणतेही काम नाही आहे आणि मी पूर्णपणे कर्जात बुडालो आहे. मी कर्जाचा ईएमआय चुकता करू शकत नाही यामुळे मी माझी आई आणि माझे जीवन संपवत आहे.

बालसुब्रमण्यम यांची स्थिती चिंताजन असून त्यांच्यावर वोकहार्ट येथे उपचार सुरू आहेत. बालसुब्रमण्यम यांची पत्नी आणि मुलीशी पोलिसांनी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्या स्थितीत नाही.पोलिसांनी या प्रकरणी केस दाखल केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -