मुंबई: यंदा धनत्रयोदशीचा सण २९ ऑक्टोबर २०२४ला साजरा केला जात आहे. या दिवशी सकाळपासून ते रात्रीपर्यंत खरेदी आणि पुजाचा शुभ मुहूर्त आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी आणि भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे.
या दिवशी संध्याकाळी प्रदोष कालामध्ये धन्वंतरीसह कुबेर आणि लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. कुटुंबात सुख-समृद्धी राहते. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळावा यासाठी धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी केले जाते. धनत्रयोदशी २०२४ला सोने खरेदीचा काय आहे शुभ मुहूर्त घ्या जाणून…
धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी २९ ऑक्टोबर मंगळवारच्या सकाळी १०.३१ मिनिटांपासून ते ३० ऑक्टोबर ६.३२ वाजेपर्यंत शुभ मुहूर्त असेल. धनत्रय़ोदशीला सोने खरेदीसाठी तुम्हाला २० तास १ मिनिटांचा शुभ काळ मिळत आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी लोक सोने, चांदी, ज्वेलरी, गाडी, घर, दुकान खरेदी करतात. याशिवाय झाडू, पितळेची भांडी, इलेक्ट्रॉनिक गोष्टी तसेच धणेही खरेदी केले जातात. चांदीची नाणी, गणपती तसेच लक्ष्मीच्या प्रतिमा खरेदी करणेही शुभ मानले जाते. कोणत्याही प्रकारच्या धातूची खरेदी करणे यादिवशी शुभ मानले जाते.