मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपापल्या याद्या जाहीर करत आहेत. त्यातच काँग्रेसने आज १४ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. याआधी काँग्रेसने तीन याद्या जाहीर केल्या आहेत.
काँग्रेसच्या या चौथ्या यादीमध्ये १४ उमेदवारांच्या नावांची घोषणा आहे. यात अंमळनेर, उमरेड, चंद्रपूर, नालासोपारा, अंधेरी पश्चिम, सोलापूर दक्षिण, पंढरपूर या जागांचा समावेश आहे.
काँग्रेसची १४ उमेदवारांची यादी
अंमळनेर - डॉ. अनिल शिंदे
उमरेड - संजय मेश्राम
अरमोरी - रामदास मसराम
चंद्रपूर - प्रवीण पडवेकर
बल्लारपूर - संतोषसिंग रावत
वरोरा - प्रवीण काकडे
नांदेड उत्तर - अब्दुल गफूर
औरंगाबाद पूर्व - लहू शेवाळे
नालासोपारा - संदीप पांडे
अंधेरी पश्चिम - अशोक जाधव
शिवाजीनगर - दत्तात्रय बहिरत
पुणे - रमेश भगवे
सोलापूर दक्षिण - दिलीप माने
पंढरपूर - भागीरथ भाळके