Thursday, December 12, 2024
Homeताज्या घडामोडीCode Of Conduct : सी- व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता उल्लंघनाच्या ३३३ तक्रारी दाखल!

Code Of Conduct : सी- व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता उल्लंघनाच्या ३३३ तक्रारी दाखल!

पहिल्या शंभर मिनीटात ३०१ कार्यवाही

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (Assembly Election 2024) अनुषंगाने जिल्ह्यात ‘सी-व्हिजिल’ (C-VIGIL App) ॲपवर आदर्श आचारसंहिता भंगाच्या ३३३ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे. त्यापैकी ३०१ तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटात कार्यवाही करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘सी व्हिजिल’ ॲप विकसित केलेले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे. या ॲपवर जिल्ह्यात नागरिकांकडून ३५२ तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी ३३३ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे.

ॲपचा वापर असा करा

‘सी व्हिजिल’ ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हीडिओ अपलोड करणे आवश्यक आहे. या ॲप तक्रार दाखल करणाऱ्या तक्रारदाराची ओळख गुप्त राखण्यात येते.

लगेच कार्यवाही करण्यात आलेली ठिकाण

तर त्यापैकी आंबेगाव विधानसभा मतदार संघात ५ तक्रारी, बारामती १२, भोसरी १, चिंचवड ६, दौंड ४, हडपसर ३, इंदापूर १, जुन्नर ३, कसबा पेठ २८, खडकवासला ५, मावळ ६, पर्वती ६१, पिंपरी २, पुणे कॅन्टोन्मेंट २०, शिवाजीनगर ७ आणि वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात १३७ अशा एकूण ३०१ तक्रारींवर पहिल्या शंभर मिनीटात कार्यवाही करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -