हुप्रतीक्षित ‘गुलाबी’ या चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच प्रदर्शित झाले असून गुलाबी शहरातील म्हणजेच जयपूरमधील तीन मैत्रिणींची धमाल यात अनुभवायला मिळते. अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे यांच्यावर चित्रपट करण्यात आलेल्या हा उत्स्फूर्त गाण्याला साई-पियुष यांचे संगीत लाभले असून मंदार चोळकर यांच्या लेखणीतून साकारलेले हे गाणे हंसिका अय्यर यांनी गायले आहे. मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणाऱ्या तिघींचा प्रवास या गाण्यातून उलगडत आहे. तिघींची बहरत जाणारी मैत्री यात दिसत असतानाच जयपूरचे रंगीबेरंगी सौंदर्यही यात अधिक रंगत आणत आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात,गुलाबी चित्रपटाचं टायटल साँग म्हणजेच या तीन स्त्रियांच्या आयुष्यातील आनंद आणि मोकळेपणाचं प्रतीक असल्याचे म्हटले. या गाण्याच्या माध्यमातून मैत्री, स्वातंत्र्य, आणि स्वप्नं यांचा एक सुसंवाद प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. पिंक सिटीमध्ये घडणाऱ्या या कथेत प्रेक्षकांना जीवनातील विविध रंग अनुभवायला मिळतील. व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तूत आणि सोनाली शिवणीकर यांची निर्मिती असून अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…