नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly election 2024) पार्श्वभूमीवर आचारसंहिता (Code Of Conduct) लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागल्यापासून पोलीस यंत्रणेसह निवडणूक आयोग अलर्ट मोडवर आले आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष कामगिरी करत आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत गेल्या १० दिवसांत एकूण १०० कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.