Thursday, December 12, 2024
Homeब्रेकिंग न्यूजRahul Gandhi : जागा वाटपावर राहुल गांधींना प्रचंड राग! CECच्या बैठकीतून घेतला...

Rahul Gandhi : जागा वाटपावर राहुल गांधींना प्रचंड राग! CECच्या बैठकीतून घेतला काढता पाय

नवी दिल्ली : विधानसभेचा रणसंग्राम (Assembly Election 2024) सुरु झाला असून राज्यात पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी सर्व प्रमुख नेते जोर लावताना दिसत आहेत. सर्व राजकीय पक्षांच्या जागावाटप जाहीर होत आहेत. मात्र मविआच्या जागावाटपाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नाराजीचा सूर मारला आहे.

मविआच्या (MVA) जागावाटपाबाबत दिल्लीमध्ये काल झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत (CEC Meeting) अनेक उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. यामध्ये विदर्भ, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागा उबाठा गटाला दिल्यामुळे राहुल गांधींना प्रचंड राग आला. ‘काँग्रेसच्या नेत्यांनी योग्यपद्धतीने वाटाघाटी केल्या नाहीत’, अशा शब्दांत राहुल गांधींनी मत व्यक्त करुन त्यांनी सुरु बैठकीतून काढता पाय घेतला.

दरम्यान, राहुल गांधी बैठकीतून गेल्यानंतरही पुढे तासभर मीटिंग सुरू होती. मुंबई व विदर्भामधील काही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आग्रहामुळे काँग्रेसला सोडून द्याव्या लागल्या. महाराष्ट्रातील काही उमेदवारांच्या नावांवर राहुल गांधी यांनी आक्षेप व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -