Sunday, July 6, 2025

Jayashree Thorat : वसंतराव देशमुखांना अटक न झाल्यास ठिय्या आंदोलन करणार!

Jayashree Thorat : वसंतराव देशमुखांना अटक न झाल्यास ठिय्या आंदोलन करणार!

डॉ. जयश्रीताई थोरात यांचा इशारा


संगमनेर : सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या संगमनेरमध्ये येवून माझ्या व आमच्या आया बहिणी बद्दल वसंतराव देशमुख (Vasantrao Deshmukh) यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले. अशा नीच प्रवृत्तीच्या माणसाला पोलीस प्रशासनाने चोवीस तासांच्या अटक करावी, अन्यथा आम्ही उद्या पुन्हा आम्ही सर्व महिला तालुका पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करणार, असा इशारा काँग्रेसच्या युवक अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात (Jayashree Thorat) यांनी दिला आहे.


यावेळी पुढे बोलताना डॉ. थोरात म्हणाल्या की, आमचा प्रशासनावर विश्वास आहे. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत परंतु आमच्या महिला भगिनींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या त्या नराधामाला पोलिसांनी अटक केलीच पाहिजे आता आम्हाला आश्वासन नको तर कारवाई पाहिजे. त्याचबरोबर त्यांना गाड्या जाळलेल्या दिसतात. अरे गाड्या येतात जातात पण आमच्या आया बहिणीची आब्रू काढतात ते त्यांना दिसत नाही का? आमचा स्वाभिमानाला ठेच पोहोचवण्याचे काम त्यांनी करू नये. यामध्ये त्यांनी राजकारण करू नये, असेही त्यांनी म्हटले.

Comments
Add Comment