मुंबई : दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. राज्यभरातील सर्व बँका सणासुदीच्या दिवशी बंद असतात. अशातच आता दिवाळी सण येत असून यावेळी चार दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. पाहा कोणत्या दिवशी असणार बँका बंद.
विविध राज्यातील ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी बँका बंद राहणार आहेत. परंतु विविध राज्यांमध्ये बँकांना वेगवेगळ्या दिवशी सुट्टी असणार आहे.
३१ ऑक्टोबर रोजी दिवाळीनिमित्त आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरी, तेलंगणा आणि तामिळनाडू, दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये दिवाळीची सुट्टी असेल. तर त्रिपुरा, महाराष्ट्र, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर, मेघालयमध्ये या दिवशी सुट्टी नसेल.
महाराष्ट्रातील बँका १ नोव्हेंबर, २ नोव्हेंबर आणि ३ नोव्हेंबर असे सलग तीन दिवस बंद असणार आहेत.