Devendra Fadnavis : आधी 'वर्षा' मग 'मातोश्री' आता 'सागर' बंगल्यावर पोहचले अनंत अंबानी; फडणवीसांच्या घरी, मध्यरात्री बारा वाजता नक्की काय झाली बंद दाराआड चर्चा?

मुंबई : सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) वारे वाहू लागले असताना सर्व पक्षांकडून जय्यत तयारी सुरु झाली आहे. अनेक मित्रपक्षाच्या गाठीभेटी सुरु आहेत. अशातच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनंत अंबानी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाचे उधाण पसरले आहे.


मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास अनंत अंबानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दीड ते दोन तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु यावेळी नेमक्या कुठल्या विषयांवर चर्चा झाल्या ये अद्यापही स्पष्ट झाले नाही.



अंबानी कुटुंबाच्या आधीही झाल्या राजकीय भेटी


ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांनी 'मातोश्री' निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. रात्री साडेदहा वाजता सुरु झालेली बैठक जवळपास दोन तास चालली होती. या बैठकीला तेजस ठाकरेही उपस्थित होते.


त्याचबरोबर मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी जात अंबानी पिता-पुत्रांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्यावेळीही तासभर त्यांची चर्चा सुरु होती.

Comments
Add Comment

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे