Wednesday, December 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजभाजपाच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर; मोदी-शहांसह फडणवीस, नारायण राणे करणार प्रचार

भाजपाच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर; मोदी-शहांसह फडणवीस, नारायण राणे करणार प्रचार

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत भाजप नेते आणि राज्याचे उपमुमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांची नावे आहेत.

महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या स्टार प्रचारांची यादी निवडणूक आयोगाला पाठवली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमन्त बिश्व शर्मा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह एकूण ४० जणांचा समावेश आहे.

भाजपच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने चांगलीच कंबर कसली आहे. भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी , जे.पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत भाजपाच्या महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. विनोद तावडे यांच्यावर बिहारच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्मृती ईराणी आणि मनोज तिवारी यांचीही नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.

महाराष्ट्र राज्यातील स्टार प्रचारक

१) नरेंद्र मोदी, २) जे.पी.नड्डा, ३) राजनाथसिंह, ४) अमित शहा, ५) नितीन गडकरी, ६) योगी आदित्यनाथ, ७) डॉ. प्रमोद सावंत, ८) भुपेंद्रभाई पटोल, ९) विष्णु देव साई, १०) डॉ. मोहन यादव, ११) भजनलाल शर्मा, १२) शिवराजसिंह चौहान, १३) नायबसिंह सैनी, १४) शिवराजसिंह चौहान, १५) देवेंद्र फडणवीस, १६) चंद्रशेखर बावनकुळे, १७) शिवप्रकाश, १८) भुपेंद्र यादव, १९) आश्विन वैष्णव, २०) नारायण राणे, २१) पियुष गोयल, २२) ज्योतिरादित्य सिंदीया, २३) रावसाहेब दानवे पाटील, २४) अशोक चव्हाण, २५) उदयनराजे भोसले, २६) विनोद तावडे, २७) आशिष शेलार, २८) पंकजा मुंडे, २९) चंद्रकांत पाटील, ३०) सुधीर मुनगंटीवार, ३१) राधाकृष्ण विखेपाटील, ३२) गिरीश महाजन, ३३) रविंद्र चव्हाण, ३४) स्मृती इराणी, ३५) प्रविण दरेकर, ३६) अमर साबले, ३७) मुरलीधर मोहोळ, ३८) अशोक नेटे, ३९) डॉ. संजय कुटे, ४०) नवनीत राणा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -