मुंबई : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज शनिवारी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आली.
या दुसऱ्या यादीमध्ये २३ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. याआधी काँग्रेसने पहिल्या यादीत ४८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती.
आता महाविकास आघाडीमधील राजकारण अधिक रंगतदार होणार आहे. मागील काही दिवसांपासून जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरूच आहे. त्यामुळे अद्यापही महाविकास आघाडीचा नेमका फॉर्म्युला काय हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष हे सध्या अत्यंत जपून पावलं टाकत आहेत.
डॉ. राजेश तुकाराम मानवतकर – भुसावळ (राखीव)
डॉ. स्वाती संदीप वाकेकर – जळगाव (जामोद)
महेश गांगणे – अकोट
शेखर प्रमोदबाबू शेंडे – वर्धा
अनुजा सुनील केदार – सावनेर
गिरीश कृष्णराव पांडव – नागपूर दक्षिण
सुरेश यादवराव भोयर – कामठी
पूजा गणेश थावकर – भंडारा (राखीव)
दलीप वामन बनसोड – अर्जुनी – मोरगाव (राखीव)
राजकुमार लोटुजी पुरम – आमगाव (राखीव)
प्रो. वसंत चिंडूजी पुरके – राळेगाव
अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मंगुळकर – यवतमाळ
जितेंद्र शिवाजीराव मोघे – आर्णी (राखीव)
साहेबराव दत्तराव कांबळे – उमरखेड (राखीव)
कैलास किसनराव गोरंट्याल – जालना
मधुकर कृष्णराव देशमुख – औरंगाबाद पूर्व
विजय गोविंद पाटील – वसई
काळू बुधेलिया – कांदिवली, पूर्व
यशवंत जयप्रकाश सिंह – चारकोप
गणेश कुमार यादव – सायन कोळीवाडा
हेमंग ओगळे – श्रीरामपूर (राखीव)
अभयकुमार सतीशराव साळुंखे – निलंगा
गणपतराव आप्पासाहेब पाटील – शिरोळ