Wednesday, December 4, 2024
Homeताज्या घडामोडीJayshree Thorat : भाजप नेत्याचं आक्षेपार्ह विधान, जयश्री थोरात कडाडल्या; सुजय विखेंनाही...

Jayshree Thorat : भाजप नेत्याचं आक्षेपार्ह विधान, जयश्री थोरात कडाडल्या; सुजय विखेंनाही चांगलंच सुनावलं

अहिल्यानगर : थोरात आणि विखे-पाटील यांच्यात अहिल्यानगरमध्ये सातत्यानं खटके उडत आहेत. अशातच एका मेळाव्यात भाजप नेते आणि विखे समर्थक असलेले वसंतराव देशमुख यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलंय. संगमनेमरमध्ये याचे तीव्र पडसाद उमटले.

माजी खासदार सुजय विखे यांनी संगमनेरमधील धांदरपळ येथे युवा संकल्प मेळाव्याचं आयोजन केलं होतं. वसंतराव देशमुख यांनी या मेळाव्यात बाळासाहेब थोरात यांना इशारा देत जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं.

वसंतराव देशमुख काय म्हणाले?

“माझा बाप सगळ्यांचा बाप आहे, असं ती मुलगी म्हणत आहे. आरे तुला सुद्धा ************** हा प्रश्न आहे. ( बाळासाहेब थोरात ) आपल्या कन्येला समजावं. अन्यथा आम्ही निवडणुकीच्या काळात मैदानात उतरलो, तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही. सुजयदादा तिला प्रेमाने ताई म्हणतात. पण, सुजयदादा या ताईंचे पराक्रम सगळ्या तालुक्याला माहिती आहेत,” असं वसंतराव देशमुख यांनी सुजय विखे-पाटील यांच्या समोर वक्तव्य केलं.

हाणामारी अन् राडा…

वसंतराव देशमुख यांच्या विधानानंतर त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी म्हणून पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडण्यात आला. अकोले नाका परिसरातील विखेंचे पोस्टर फाडण्यात आले. थोरात आणि विखेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या. गाड्यांची जाळपोळ काही ठिकाणी करण्यात आली.

तुम्ही किती खालच्या पातळीवर बोलत आहात?

जयश्री थोरात वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्यावर भडकल्याच्या पाहायला मिळालं. “जे काही झालं, ते न शोभणारं आहे. मी असं काय वाईट केले होते की एवढं आक्षेपार्ह माझ्याबद्दल बोलण्यात आलं. मी माझ्या वडिलांसाठी मैदानात आले होते. त्यांच्या वयाला शोभणारं ते वक्तव्य आहे का? तुम्ही किती खालच्या पातळीवर बोलत आहात?” जयश्री थोरात यांनी असा संतप्त सवाल उपस्थित केला.

विखेंनी पातळी जपली पाहिजे…

“माझ्याबद्दल सुजय विखे यांनीही पातळी सोडून वक्तव्ये केली आहेत. स्वत:ला युवा नेते म्हणताना सुजय विखे यांनीही एक पातळी जपली पाहिजे,” असं म्हणत जयश्री थोरात यांनी चांगलंच फटकारलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -