Ranati Movie : अपून फूल ऑन डेंजर! रानटी चित्रपटाचा दमदार टिझर रिलीज

रक्तरंजीतची गोष्ट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


मुंबई : आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द असलेल्या विष्णूचा रौद्र अवतार दाखविणाऱ्या ‘रानटी’ (Ranati Movie) चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. यामध्ये अ‍ॅक्शन, ड्रामा आणि इमोशन्स यांची जबरदस्त गुंफण पाहायला मिळते आहे.
पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट असणार आहे. येत्या २२ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र दिसणार आहे. बॉलीवूडचे सुप्रसिद्ध ‘रानटी’ खलनायक जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त यांनीसुद्धा दिग्दर्शिक समित कक्कड च्या ‘रानटी चित्रपटाच्या दमदार टिझरची झलक सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.



'अपून फूल ऑन डेंजर.. डोन्ट टेक मी लाइट'


'अपून फूल ऑन डेंजर.. डोन्ट टेक मी लाइट' अशा दमदार डायलॉगने अवतरलेला ‘विष्णू’ हा बेरकी आणि कपटी व्हिलनला स्वतःच्या शक्ती आणि युक्तीने अद्दल घडवताना दिसणार आहे. हा टिझर पाहताना सर्वांच्याच अंगावर अक्षरशःकाटे येतात. हा टिझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.


‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचे लिखाण, अजित परब यांचे संगीत, अमर मोहिले यांचे पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचे छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचे संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम चित्रपटाला लाभलेली आहे.

Comments
Add Comment

रिया चक्रवर्तीला दिलासा: मुंबई उच्च न्यायालयाने पासपोर्ट परत करण्याचे दिले आदेश!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ला अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा पासपोर्ट

झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : मॅनेजरनेच दिले विष, समोर आली धक्कादायक माहिती

सिंगापूर : सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्ग याचा १९ सप्टेंबरला सिंगापूर येथे नॉर्थ इस्ट इंडिया फेस्टिवल दरम्यान बुडून

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन; वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास!

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता व्ही. शांताराम यांच्या पत्नी, ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्री संध्या

अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पदक जाहीर

सांगली (वार्ताहर) : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक

गरोदरपणानंतर रुबिना दिलीकचा आत्मविश्वास डगमगला!

मुंबई: पती-पत्नी और पंगा या शोमध्ये अभिनेत्री रुबिना दिलैक पती अभिनव शुक्ला सोबत मस्ती करताना दिसत आहे. या

तर त्या पुरस्काराला काही अर्थ नाही: राणी मुखर्जी

एका पॉडकास्टमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जीने तिच्या राष्ट्रीय पुरस्कारानंतरच्या भावना व्यक्त केल्या. ती