Sunday, December 15, 2024
Homeताज्या घडामोडीRanati Movie : अपून फूल ऑन डेंजर! रानटी चित्रपटाचा दमदार टिझर रिलीज

Ranati Movie : अपून फूल ऑन डेंजर! रानटी चित्रपटाचा दमदार टिझर रिलीज

रक्तरंजीतची गोष्ट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द असलेल्या विष्णूचा रौद्र अवतार दाखविणाऱ्या ‘रानटी’ (Ranati Movie) चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. यामध्ये अ‍ॅक्शन, ड्रामा आणि इमोशन्स यांची जबरदस्त गुंफण पाहायला मिळते आहे.
पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट असणार आहे. येत्या २२ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र दिसणार आहे. बॉलीवूडचे सुप्रसिद्ध ‘रानटी’ खलनायक जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त यांनीसुद्धा दिग्दर्शिक समित कक्कड च्या ‘रानटी चित्रपटाच्या दमदार टिझरची झलक सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.

‘अपून फूल ऑन डेंजर.. डोन्ट टेक मी लाइट’

‘अपून फूल ऑन डेंजर.. डोन्ट टेक मी लाइट’ अशा दमदार डायलॉगने अवतरलेला ‘विष्णू’ हा बेरकी आणि कपटी व्हिलनला स्वतःच्या शक्ती आणि युक्तीने अद्दल घडवताना दिसणार आहे. हा टिझर पाहताना सर्वांच्याच अंगावर अक्षरशःकाटे येतात. हा टिझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचे लिखाण, अजित परब यांचे संगीत, अमर मोहिले यांचे पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचे छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचे संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम चित्रपटाला लाभलेली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -