संगमनेर : संगमनेर तालुक्यातील धांदरफळ या ठिकाणी भाजपाचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची सभा घेण्यात आली. या सभेमध्ये वसंतराव देशमुख यांनी महिलांविषयी अपशब्द वापरून त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली. त्यामुळे संगमनेर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. संगमनेर तालुक्यातील चिखली व अकोले रोड या ठिकाणी अज्ञातांनी गाड्या फोडल्या असून काही गाड्या जाळल्या आहेत.
त्यानंतर संगमनेर तालुका पोलीस स्टेशन परिसरात हजारोंच्या संख्येनं आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. यावेळी वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी अशी तीव्र मागणी त्यांनी केली. सुजय विखे व वसंतराव देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.