Friday, December 13, 2024
Homeब्रेकिंग न्यूजसुजय विखे विरोधात राज्यासह महायुतीमध्येही संतापाची लाट

सुजय विखे विरोधात राज्यासह महायुतीमध्येही संतापाची लाट

अजित पवार,चंद्रशेखर बावनकुळे, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंकडून निषेध

संगमनेर : बेताल व भडक वक्तव्य करणाऱ्या माजी खासदार सुजय विखे यांच्या सभेमध्ये वसंत देशमुख याने डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या विरोधात अत्यंत गलिच्छ शब्दात टीका केल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह महायुतीमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून महायुतीला फटका बसेल असे वक्तव्य करू नका अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे यांच्यासह अनेकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात हे राज्यातील सुसंस्कृत व अभ्यासू नेते असून सर्व पक्षांमध्ये त्यांचा आदर आहे. सामाजिक जीवनात ४० वर्षे काम करताना त्यांनी विरोधकांचाही सन्मान केला आहे. मात्र व्यक्ति दोष ठेवून सुजय विखे यांनी संगमनेर तालुक्यामध्ये विविध सभांमधून त्यांच्यावर पातळीवर टीका केली. भडक भाषणांमुळे वसंत देशमुख यांनी महिलांवर अत्यंत वाईट टीका केली. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुजय विखे यांना चांगलेच सुनावले महायुतीमध्ये वाद होईल, असे चुकीचे वक्तव टाळा असे सांगून या घटनेचा निषेध केला. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ही झालेली घटना दुर्दैवी असून अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी महायुतीच्या नेत्यांनी काळजी घ्यावी, असे सांगितले. रूपाली चाकणकर यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला असून महिला आयोगाच्या वतीने तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही घटना अत्यंत निंदनीय असून महाराष्ट्राची मान खाली घालणारी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यशोमती ठाकूर यांनी सुजय विखे व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी बेताल वक्तव्य करून राज्यांमध्ये महिला भगिनी असुरक्षित केल्या असल्याची टीका केली आहे. खासदार अमोल कोल्हे, सचिन खरात, मंत्री उदय सामंत, नरहरी झिरवळ यांनीही आपल्या प्रतिक्रिया देताना या घटनेचा निषेध केला आहे.

संगमनेरमध्ये वातावरण संतप्त झाले असून विखे यांना तालुका बंदीचा ठराव करण्यात आला आहे याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून विखे यांना येण्यापासून रोखले जाण्याची शक्यता असल्याने महायुतीने विखे यांना प्रचारापासून दूर लोटले आहे.

सुजय विखे यांनी घाणेरडी पातळी गाठली -आ. सत्यजित तांबे

लोकशाहीमध्ये सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे परंतु नीतीमूल्य जपली पाहिजे सुजय विखे यांनी मागील काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यात सभांमधून भडक वक्तव्य करून घाणेरडी पातळी गाठली आहे. तालुक्यातील एक वृद्ध कायम बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करत असून अशा लोकांना सोबत घेऊन ते प्रचारात फिरत आहे. त्यांच्या या पद्धतीचा मी तीव्र निषेध करून अशा नीच लोकांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असून मी लवकरच याबाबत सर्व बोलणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

संतराव देशमुख यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले असेल तर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी- डॉ. सुजय विखे पाटील

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ याठिकाणी महायुतीच्या जाहीर सभेमध्ये वसंतराव देशमुख यांनी महिलांबद्दल अपशब्द वापरले. या सभेमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील हे सुद्धा हजर होते. त्यांचे भाषण संपल्यानंतर स्थानिक महिलांनी गोंधळ केला. त्यानंतर डॉ. सुजय विखे यांनी या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे. त्याच बरोबर आज शनिवार दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी देखील मोर्चा काढत वसंत देशमुख यांनी केलेल्या व्यक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे.

दरम्यान डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की, महायुतीच्या सभेमध्ये वसंतराव देशमुख बोलत असताना मी त्यांना दोन वेळा थांबण्याचा इशारा दिला. परंतु ते थांबले नाही. त्यानंतर मी एका कागदावर लिहीत बसलो आणि मी त्यांच्या भाषणाकडे लक्ष दिले नाही. माझे भाषण संपल्यानंतर गोंधळ सुरू झाला. गोंधळ सुरू झाल्यानंतर मी एका जणाला विचारले की, हा काय प्रकार आहे तर त्यांनी मला सांगितले का वसंतराव देशमुख यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीबद्दल अपशब्द वापरले.

महायुतीच्या वतीने आम्ही व मी स्वतः या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. त्याचबरोबर वसंतराव देशमुख यांनी जे काही वक्तव्य केलेले आहे. त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी तसेच पक्षाच्या वतीने ही आम्ही त्यांच्यावर कारवाई करू अशा लोकांना आम्ही पक्षांमध्ये ठेवणार नाही, परंतु सभा संपल्यानंतर आमचे जे कार्यकर्ते गाड्या मधून आले होते. त्या गाड्यांमध्ये काही महिला होत्या त्यांना खाली उतरून ज्या लोकांनी त्यांच्या दगडफेक केली, गाड्या जाळल्या गाड्या फोडल्या अशा लोकांवरही पोलिसांनी कारवाई करावी, असे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -