Thursday, December 12, 2024
Homeब्रेकिंग न्यूजभाजपाच्या दुसऱ्या यादीत २२ जणांचा समावेश; जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी

भाजपाच्या दुसऱ्या यादीत २२ जणांचा समावेश; जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी

भीमराव तापकीर, देवयानी फरांदे, गोपीचंद पडळकर, राम सातपुते यांचा समावेश

मुंबई : भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत २२ जणांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपाने आतापर्यंत १२१ उमेदवार जाहीर केले आहेत. भाजापने अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे

दुसऱ्या यादीत मुंबईच्या एकाही मतदारसंघाचे नाव नाही. मात्र पुण्यातील तिन्ही जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली आहे. भाजपने खडकवासला विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली आहे.

नाशिकमधील देवयानी फरांदे यांना दुसऱ्या यादीत संधी मिळाली आहे. सांगली जिल्ह्यातील जतमधून विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर सोलापूरमधील राम सातपुते यांचे दुसऱ्या यादीत देखील नाही.

तर महायुतीत वाद असलेल्या आष्टी मतदारसंघाचा देखील या यादीत समावेश नाही. पेणमधून रवींद्र पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. विक्रमगडची जागा देखील भाजपच्या वाट्याला आली आहे.

दुसऱ्या यादीतील सर्व २२ उमेदवारांची नावे

मतदारसंघ – उमेदवाराचे नाव

धुळे ग्रामीण – राम भदाणे
मलकापूर – चैनसुख संचेती
अकोट – प्रकाश भारसाकळे
अकोला पश्चिम – विजय अग्रवाल
वाशिम – श्याम खोडे
मेळघाड – केवलराम काळे
गडचिरोली – मिलिंद नरोटे
राजुरा – देवराम भोंगळे
ब्रह्मपुरी – कृष्णलाल सहारे
वरोरा – करण संजय देवतळे
नाशिक मध्य – देवयानी फरांदे
विक्रमगड – हरिश्चंद्र भोये
उल्हासनगर – कुमार ऐलानी
पेण – रावींद्र पाटील
खडकवासला – भीमराव तपकीर
पुणे छावणी – सुनील कांबळे
कसबा पेठ – हेमंत रासणे
लातूर ग्रामीण – रमेश कराड
सोलापूर शहर मध्य – देवेंद्र कोठे
पंढरपूर – समाधान औताडे
शिराळा – सत्यजीत देशमुख
जत – गोपीचंद पडळकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -