Thursday, December 12, 2024
Homeरणसंग्राम २०२४१४१ - उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात प्रशिक्षण उत्साहात

१४१ – उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात प्रशिक्षण उत्साहात

मतदान केंद्र अध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचारी उपस्थित

उल्हासनगर (वार्ताहर) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अानुषंगाने १४१ उल्हासनगर विधानसभा मतदार संघातील निवडणुकीच्या कामकाजा संदर्भात, मतदान केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकारी, कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण २० ऑक्टोबरला टाऊन हॉल येथे पायाभूत व सेवासदन कॉलेज येथे इव्हीएमचे प्रशिक्षण पार पाडण्यात आले, सदर प्रशिक्षण हे दोन सत्रात पार पाडण्यात आले. सदर प्रशिशिक्षणास एकूण १५५२ अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी १२४८ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सदर प्रशिक्षण हे विजयानंद शर्मा, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, उल्हासनगर यांनी दिले. तसेच अधिकारी कर्मचारी यांनी विचारलेल्या समस्यांचेही निराकरण केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -