Wednesday, April 30, 2025

रणसंग्राम २०२४राजकीय

महाविकास आघाडीकडून सुनील भुसारा यांनी भरला उमेदवारी अर्ज

महाविकास आघाडीकडून सुनील भुसारा यांनी भरला उमेदवारी अर्ज

मोखाडा (वार्ताहर) :निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, काल २४ रोजी विक्रमगड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सुनील भुसारा यांनी सर्वात अगोदर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना उबाठा, काँग्रेस, सीपीएम, कष्टकरी संघटना अशा सर्व पक्षांचे जिल्हा तालुका प्रमुख संघटना सचिव आदी उपस्थित होते. हा उमेदवारी अर्ज प्रातिनिधिक स्वरूपाचा भरलेला असून येता २८ तारखेला माझ्या माय बाप जनतेच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे यावेळी भुसारा यांनी सांगितले.

विक्रमगड विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असून तशा हालचाली सुरू आहेत अशावेळी महाविकास आघाडीकडून भुसारा यांनी सर्वात आधी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असे असताना दुसरीकडे महायुतीकडून अद्यापही उमेदवार आणि पक्षही ठरलेला नसल्याने महावीकास आघाडीच्या सुनिल भुसारा यांच्या विरोधात नेमका कोण उमेदवार असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा कडून राज्य स्तरावरून उमेदवार यादी जाहीर केलेली नसल्याचे चित्र असले तरी सुनील भुसारा यांनी पक्षाच्या एबी फॉर्म भरला.

Comments
Add Comment