Tuesday, December 10, 2024
Homeताज्या घडामोडीST employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळीआधीच पगार!

ST employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळीआधीच पगार!

३५० कोटींची रक्कम महामंडळाकडे वर्ग

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने (State Government) त्यांचा पगार दिवाळीआधीच (ST employees Salary) देण्याचा निर्णय घेतला असून सरकारने त्यासाठी लागणारी रक्कम महामंडळाकडे वर्ग केली आहे. शासनाने कर्मचाऱ्यांसाठी सप्टेंबर महिन्याचे सवलत मूल्य ३५० कोटी रुपये महामंडळाला प्रदान करण्यात आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा दरमहिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान होतो. मात्र त्यापूर्वी येणाऱ्या दिवाळीत आर्थिक खर्च, सणांसाठीची खरेदी कशी करायची असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांसमोर आहे. कर्मचाऱ्यांची ही समस्या आता शासनाच्या निर्णयाने दूर होणार आहे. राज्यात सणासुदीच्या दिवसात प्रवासासाठी एसटी बसचा सर्वाधिक वापर होतो. दिवाळी सणाच्या गर्दीच्या हंगामात प्रवासीसंख्या वाढत असल्याने महामंडळाला चांगला महसूलही मिळतो. त्यासाठी सणासुदीला सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड व्हावी, यासाठी महामंडळाने आधीच पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ७ तारखेला होत असतो. यंदा सोमवारी २८ ऑक्टोबरला वसूबारस ते रविवारी ३ नोव्हेंबरला भाऊबीज यादरम्यान दिवाळी सण साजरा होणार आहे. त्यामुळे दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पगार जमा करण्याचा महामंडळाचा मानस आहे. यासाठी राज्य सरकारकडून लवकर निधी मिळण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. दिवाळी सणानिमित्त एसटी कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपयांची दिवाळीभेट देण्यात येते. यंदा ही भेट कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणीही महामंडळाने राज्य सरकारकडे केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -