मुंबई : अंगणवाडीतील बालकांना वर्षातील ३०० दिवस पोषण आहार मिळावा यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन टप्प्यांत दिलेल्या सुट्टीला विरोध झाल्यानंतर बुधवारी हा निर्णय शासनाने मागे घेतला.
आता अंगणवाडी सेविकांना व मदतनिसांना २७ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत सात दिवस सलग दिवाळीची सुट्टी असणार आहे.
शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात वाढ करत त्यांच्या कामाची वेळ दोन तासांनी वाढवली आहे. अंगणवाडीतील बालकांना वर्षातील ३० दिवस पोषण आहार मिळावा यासाठी शासनाने अंगणवाडी सेविकांना ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर तर मदतनीस यांना ८ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीची सुट्टी मंजूर केल्याचा आदेश मंगळवारी काढला. मात्र, याला अंगणवाडी सेविका व मदतनिसांकडून तीव्र विरोध झाला. त्यानंतर बुधवारी शासनाने हा आदेश मागे घेतला.