मुंबई: जर तुम्हाला तुमच्या घरात पैशांची तंगी जाणवत असेल तर वास्तुशास्त्रात या संकटाला दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. वास्तुशास्त्रानुसार जर घरात धनसंकट सुरू असेल तर काही पक्ष्यांचे फोटो लावणे अतिशय शुभ मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार जर या पक्ष्यांचे फोटो तुम्ही लावत असाल तर घरात आनंद राहतो. हे फोटो लावल्याने घरात सकारात्मकता येते. नकारात्मकता घरातून निघून जाते. मोराला वास्तुशास्त्रात विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात मोराला शुभ आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते.
मोराचा फोटो घरात लावणे फायदेशीर मानले जाते. तसेच घरात सुख-शांती आणि समृद्धी राहते. वादग्रस्त वातावरण राहत नाही. जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर मोराचा फोटो लावल्याने तो दूर होतो. मोराचा फोटो नेहमी पूर्व दिशेला लावा.
वास्तुशास्त्रानुसार घरात नीलकंठचा फोटो लावणेही शुभ मानले जाते. असे केल्याने घरात वृद्धी होते. घरात नकारात्मक ऊर्जा वाढल्यास अथवा तणावपूर्ण स्थिती असल्यास पूर्व अथवा उत्तर-पूर्व दिशेला नीलकंठचा फोटो लावा.
टीप – वर दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार कोणत्याही प्रकारे याची पुष्टी करत नाही. संबंधित गोष्टींसाठी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.