Tuesday, December 10, 2024
Homeताज्या घडामोडीPushpa 2 : पुष्पा २'ची रिलीज डेट पुन्हा बदलली! नवी तारीख आली...

Pushpa 2 : पुष्पा २’ची रिलीज डेट पुन्हा बदलली! नवी तारीख आली समोर

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लु अर्जुन (Allu Arjun) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) ‘पुष्पा २: द रुल’ (Pushpa 2 The Rule) या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. बहुप्रतिक्षित चित्रपट असलेल्या ‘पुष्पा २: द रुल’ बाबत सातत्याने नवीन अपडेट्स समोर येत आहेत. १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता. त्यानुसार ६ डिसेंबर रोजी पुष्पा २: द रुल’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता पुन्हा प्रदर्शनाची तारीख बदलण्यात (Pushpa 2 Release Date) आली आहे. त्यामुळे चाहत्यांना ६ डिसेंबर आधीच पुष्पा २ चित्रपट पाहायला मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पा २ चित्रपट प्री-पोन करण्यात आला आहे. हा चित्रपट आता एक दिवस आधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हैदराबादमध्ये एका मोठ्या कार्यक्रमात चित्रपटाच्या निर्मात्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली. त्यानुसार पुष्पा २ चित्रपट ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

रिलीजच्या आधीच कोट्यवधींची कमाई

पुष्पा २ चित्रपटाने रिलीजच्या आधीच कोट्यवधींची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने १०८५ कोटींचे प्री-रिलीझ कलेक्शन जमा केले आहे. डिसेंबरपर्यंत हा आकडा आणखी वाढून रेकॉर्डब्रेक कमाई करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -