उल्हासनगर (वार्ताहर) : स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त गवस साहेबांचे अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृह येथे स्वीप ग्रुपमधील सर्व स्वीप समिती सदस्य सीएमएम, एसएसटी, आरकेटी, वेदांत कॉलेजमधील संबंधित शिक्षक, प्रशासन अधिकारी, सहाय्यक आयुक्त निवडणूक, दिव्यांग विभाग प्रमुख, एनयुएलएमविभाग प्रमुख, जनसंपर्क अधिकारी व इतर यांची बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीमध्ये नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त गवस साहेब यांनी सर्व सदस्यांनी निवडणूक जनजागृती निमित्त उपक्रमांचे नियोजन करून त्याप्रमाणे जास्तीत जास्त व परिणामकारक उपक्रम राबवून महापालिका क्षेत्रातील मतदान टक्केवारी वाढवावी असे निर्देश दिले.
निवडणूक जनजागृतीनिमित्त विविध उपक्रमांचे नियोजन