Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

कोकणात एकही जागा न देता उबाठाने काँग्रेसला भावपूर्ण श्रद्धांजलीच वाहिली!

कोकणात एकही जागा न देता उबाठाने काँग्रेसला भावपूर्ण श्रद्धांजलीच वाहिली!

कणकवली : काँग्रेस पक्षाच्या यादीत असलेल्या जागांवर उद्धव ठाकरे आपले एबी फॉर्म देऊन कार्यकर्त्यांना उमेदवारी देत आहेत. राज्यात अशा दहा जागा आहेत. ज्या वर दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठी समोर चर्चा सुरू आहे. मात्र एकीकडे महाविकास आघाडीची पिपाणी वाजवायची आणि दुसरीकडे स्वतःच्या मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसला भीक न घालता आपल्या पक्षाची उमेदवारी वाटण्याचे काम उबाठाच्या माध्यमातून सुरू आहे. यातूनच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आयुष्यात कोणाचेच होऊ शकले नाहीत. ते काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ही होऊ शकत नाहीत हे दिसून आले आहे. कोकणामधून तर उबाठाने काँग्रेसला एकही जागा न देता भावपूर्ण श्रद्धांजलीच वाहिली आहे. अशी टीका भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी केली.

आमदार नितेश राणे पत्रकार परिषद कणकवली येथे बोलत होते. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्म वाटले जात आहेत. जे अर्ज उद्धव ठाकरे वाटत आहेत. त्यातल्या किती जागा काँग्रेसला द्यायच्या ठरल्या होत्या हे काँग्रेस पक्षाने प्रामाणिकपणे जाहीर करावे. आज काँग्रेसला कोकणातून उद्धव ठाकरे यांनी भुईसपाट केले आहे, संपवून टाकले आहे. याचा काँग्रेसने विचार केला पाहिजे. जर कोकणात सर्व जागा उबाठा लढणार तर विदर्भात काँग्रेसला झुकते माप का नाही, असा सवाल यावेळी आमदार नितेश राणे यांनी केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >