Friday, December 13, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेबाळासाहेबांच्या विचारांची साथ सोडणाऱ्यांचा एकही आमदार कोकणात येऊ देणार नाही

बाळासाहेबांच्या विचारांची साथ सोडणाऱ्यांचा एकही आमदार कोकणात येऊ देणार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठांवर टीका

ठाणे : ठाणे लोकसभा जिंकण्यासाठी त्यांना जंग जंग पछाडले. मात्र, त्यांची पळता भोई थोडी झाली. बाळासाहेबांचे विचार सोडले. त्यामुळेच कोकणाने त्यांची साथ सोडली. आता एकही आमदार कोकणात दिसणार नाही. कोकणात एकही खासदार आला नाही, आता एकही आमदार येऊ देणार नाही; सगळे किल्ले उद्धवस्त झाले, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते ठाण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीने बंद पडलेले प्रकल्प, स्टे दिलेले स्पीड ब्रेकर घातलेले प्रकल्प आम्ही सुरु केले. विकासाचे प्रकल्प , कल्याणकारी योजना, लाडकी बहीण सारख्या अनेक योजना आम्ही आणल्या. विकास आणि योजना याची सांगड घालण्याचे काम आम्ही केले. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग आले आहेत. जनता जनार्दन येणाऱ्या काळात आमच्या कामाची पोचपावती देईल. महायुतीचे सरकार, बहुमताचे सरकार मेजोरिटीने महाराष्ट्रात येईल. आम्ही पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्यास तयार आहोत. आमची दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध होईल.

मशाल विरुद्ध धनुष्यबान हा लोकसभेत जिंकलेला आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही १३ जागांवर समोरासमोर लढलो. त्यांपैकी सात जागा आम्ही जिंकल्या. ४० टक्के स्ट्राइकरेट त्यांचा तर ४७ टक्के स्ट्राइकरेट आमचा होता. त्याचबरोबर आम्हाला २ लाख ६० हजार मते अधिक मिळाली आहेत. त्यामुळे लोकसभेत एवढी सर्व फेकाफेक करून फेक नरेटिव्ह करूनही धनुष्यबाण त्यांच्यावर भारी पडला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

महायुतीचाच स्ट्राइक रेट अधिक असणार

आपण मुख्य नेते म्हणून उमेदवारांच्या प्रचारार्थ संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहात, या विधानसभेचा स्ट्राइकरेट कसा असेल असे वाटते? यावर बोलताना शिंदे म्हणाले, लोकसभेत एवढे सर्व फेक नेरेटिव्ह पसरवूनसुद्धा, लोकांना फसवूनही आमचा स्ट्राइकरेट उबाठा पेक्षा अधिक होता. तसेच महायुतीचा स्ट्राइकरेट जो आहे, तो या निवडणुकीत कामाच्या जोरावर, विविध योजनांच्या जोरावर स्ट्राइकरेट एकदम सर्वात भारी असेल आणि सर्वांना चारीमुंड्या चीत करेल. आमचे लोक या निवडणुकीत चौकार आणि षटकार मारतील, असा दावा त्यांनी यावेळी केला.

लोकसभेला मशालीपेक्षा धनुष्यबाणाला पडली अधिक मते

मशाल विरुद्ध धनुष्यबान हा लोकसभेत जिंकलेला आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही १३ जागांवर समोरासमोर लढलो. त्यांपैकी सात जागा आम्ही जिंकल्या. ४० टक्के स्ट्राइकरेट त्यांचा तर ४७ टक्के स्ट्राइकरेट आमचा होता. त्याचबरोबर आम्हाला २ लाख ६० हजार मते अधिक मिळाली आहेत. त्यामुळे लोकसभेत एवढी सर्व फेकाफेक करून फेक नरेटिव्ह करूनही धनुष्यबाण त्यांच्यावर भारी पडला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते ठाण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.

आपण मुख्य नेते म्हणून उमेदवारांच्या प्रचारार्थ संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहात, या विधानसभेचा स्ट्राइकरेट कसा असेल असे वाटते? यावर बोलताना शिंदे म्हणाले, लोकसभेत एवढे सर्व फेक नेरेटिव्ह पसरवूनसुद्धा, लोकांना फसवूनही आमचा स्ट्राइकरेट उबाठा पेक्षा अधिक होता. तसेच महायुतीचा स्ट्राइकरेट जो आहे, तो या निवडणुकीत कामाच्या जोरावर, विविध योजनांच्या जोरावर स्ट्राइकरेट एकदम सर्वात भारी असेल आणि सर्वांना चारीमुंड्या चीत करेल. आमचे लोक या निवडणुकीत चौकार आणि षटकार मारतील, असा दावा त्यांनी यावेळी केला.

लाडकी बहिणीच महायुतीला सत्तेत आणणार

आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली, त्याच वेळी त्यांनी (महाविकास आघाडी) खोडा घातला. ते न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने त्यांना चपराक दिली, हाकलवून लावले. यानंतर ते नागपूरच्या न्यायालयात गेले. काँग्रेसचे वडपल्लीवार गेले आहेत. त्यामुळे लाडकी बहिण योजना त्यांच्या पोटात सलती आहे आणि पोटात खुपती आहे. त्यांनी सगळे सांगितले आहे की, ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्या बंद पाडू, चौकशी करू. म्हणून त्यांना जनता साथ देणार नाही. त्यांचे सरकारच येणार नाही. त्यामुळे त्यांना संधी मिळणार नाही. लाडक्या बहिणींनी ठरवले आहे की, या लाडक्या भावांना पुन्हा या सरकारमध्ये आणायचे आहे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

योजना बंद करणाऱ्या जनता घरी बसविणार

आम्ही जी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे, ती कुणीही कितीही काहीही केले तरी बंद होणार नाही. ही योजना वाढतच जाईल आणि त्याचे पैसेही वाढत जातील. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दिला आहे. एवढेच नाही तर, आम्ही सुरू केलेल्या कुठल्याही योजना बंद पडणार नाहीत. सर्व योजना जनतेच्या आहेत. जे योजना बंद पाडायचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जनता कायमस्वरुपी घरी बसवेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -