वांद्रे पूर्व येथून उमेदवारी जाहीर
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique) यांनी आज अजित पवारांच्या (Ajit pawar Group) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीने झिशान सिद्दिकी यांना वांद्रे पूर्व येथून उमेदवारी दिली आहे.
अजित पवार यांच्याकडून यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा
‘आपल्या वडिलांचा लोकसेवेचा, समाजसेवेचा वारसा झिशान हे नेटानं पुढे नेतील, असा विश्वास आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो.” असे अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचे सुपुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. आपल्या वडिलांचा लोकसेवेचा, समाजसेवेचा वारसा झिशान हे नेटानं पुढे नेतील, असा विश्वास आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि पुढील यशस्वी… pic.twitter.com/cspmBAc1iO
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 25, 2024
पक्ष प्रवेशानंतर झिशान सिद्दिकी काय म्हणाले?
‘कठिण काळात अजित पवार, सुनिल तटकरे माझ्यामागे उभे राहिलेत. त्यांनी मला मदत केली . रेकॉर्डब्रेक मतांनी मी विजयी होईल. कांग्रेसने ढोंगीपणा केला आणि तो आता जनतेच्या समोर आला आहे. असे त्यांनी म्हटले.