सुलभा गायकवाड यांनी भरला अर्ज
कल्याण (वार्ताहर) : राज्यातील महायुतीच्या माध्यमातून कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. सुलभा गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करीत गुरुवारी ‘ड’ प्रभाग कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी तिसाई हाऊस ते प्रभाग ‘ड’ कार्यालय या दरम्यान युतीच्या अनेक गणमान्य नेत्यांच्या उपस्थितीत भव्य अशी शक्तिप्रदर्शन रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत मंत्री रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजपा नेते विनोद तावडे, आमदार कुमार आयलानी, दलीत मित्र अण्णा रोकडे, कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, शिवसेना नगरसेविका माधुरी काळे यांच्यासह सुमारे ५ हजारांहून अधिक महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. उत्साही वातावरणात आणि ढोल ताशा , डिजे , चित्र रथ , त्याच बरोबर विविध जाती धर्मातील ताल वाद्यांच्या गजरात निघालेल्या या रॅलीत आमदार गणपत गायकवाड यांचे खंदे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले