नेमकं कारण काय?
मुंबई : कोणताही सण, खेळ, विशेष दिवस असो किंवा भारताची यशस्वी मोहिम असो अशावेळी गुगलकडून नवं ‘डल’द्वारे (Google Doodle) शुभेच्छा दिल्या जातात. गुगल ‘डूडल’ हा एक उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय ठरतो. गुगलचे नवे डूडल काय असेल याविषयी सर्वांनाच नेहमीच आकर्षण असते.
आज गुगलवर एका अष्टपैलू गायकाचं डुडल तयार केलं आहे. कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’ यांचं खास डुडल तयार केलं आहे. मात्र आज त्यांचा जन्म किंवा पुण्यतिथी नसली तरीही गुगलने हे डुडल का तयार केले असा प्रश्न सर्व नेटकऱ्यांना पडत आहे. पाहा यामागचं नेमकं कारण काय.
आजच्या दिवशी केके यांचं बॉलिवूडमध्ये पार्श्वगायक म्हणून पदार्पण
२५ ऑक्टोबर १९९६ साली माचिस सिनेमातून केके यांनी बॉलिवूडमध्ये पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले होते. ‘छोड़ आए हम’ या गाण्याने त्यांच्या कामाची सुरुवात झाली होती. यानंतर १९९९ मध्ये केके यांनी ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमातील ‘तड़प तड़प के इस दिल से’ हा गाणं गायले होते. यानंतर चित्रपटसृष्टीत त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. केके यांच्या म्युझिक अल्बमची तरुणाईत विशेष क्रेझ होती. अजूनही तरुणाईत ही क्रेख कायम असल्याचे दिसून येते. त्यामुळे केके यांचा वारसा साजरा करण्यासाठी गुगलने केके याचं खास डुडल तयार केले.