जळगाव (प्रतिनिधी) : राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून, सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. आज मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांच्यासोबत लढत होणार आहे. ४० वर्षांनंतर प्रथमच मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे आली आहे.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाची उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुक्ताईनगरमध्ये महायुतीच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती, तर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार असून त्यांच्या विरोधात चंद्रकांत पाटलांची लढत होणार आहे. एकनाथ खडसे यांचं या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व होते. मात्र, एकनाथ खडसेंचा हा गड भेदण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीचा शुभारंभ हा मुक्ताईनगरमध्ये केला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.