Saturday, July 5, 2025

Atul Mhatre : अतुल म्हात्रेंना निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी महाराजांसमोर घेतली शपथ!

Atul Mhatre : अतुल म्हात्रेंना निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी महाराजांसमोर घेतली शपथ!

रायगड किल्ल्यावर जाऊन केला प्रचाराचा शुभारंभ


पेण : पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदार संघातून शेकाप आघाडीचे अधिकृत उमेदवार अतुल नंदकुमार म्हात्रे यांना निवडून देण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शपथ घेतली आहे. आज रायगड किल्ल्यावरून अतुल म्हात्रे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह आपल्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला.


"छत्रपती शिवाजी महाराज की जय", "जय भवानी, जय शिवाजी" अशा घोषणांनी संपूर्ण रायगड परिसर दुमदुमला होता. पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाकडून अतुल म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने शेकाप व आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे.


यावेळी रायगडावर जि.प.सदस्य सुरेश खैरे, माजी सरपंच महेंद्र ठाकूर, रोशन पाटील, प्रल्हाद पाटील, निलेश म्हात्रे, दिपक पाटील, एन.जी.ठाकूर, राजन झेमसे, नरेंद्र पाटील, नमिता म्हात्रे, महाबळे, राजेश पाटील, सुनील वाघमारे, मंगेश पाटील, वैभव पाटील, विकी पाटील, तेजस पाटील, खाडेकर गुरुजी, नासीर भाई आदी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Add Comment