Thursday, January 22, 2026

Gold seized : मुंबई विमानतळावर ९.४८७ किलो सोने जप्त!

Gold seized : मुंबई विमानतळावर ९.४८७ किलो सोने जप्त!

मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या विशिष्ट गोपनीय माहितीनुसार कारवाई करत जयपूरहून मुंबईला येणाऱ्या विमानातून दोन प्रवाशांना तपासणीसाठी अडवले. अधिकाऱ्यांनी त्यांच्या सामानाची तपासणी केल्यावर एकूण ९,४८७ ग्रॅम विदेशी सोन्याचे तीन पॅकेट जप्त (Gold seized) केले. या सोन्याचे बाजार मूल्य अंदाजे ७.६९ कोटी रुपये इतके असल्याची माहिती मिळत आहे.

दोन्ही प्रवासी आरोपींनी प्रवासादरम्यान तस्करीच्या उद्देशाने सोने आणि स्वत:ची  खरी ओळख लपवून प्रवास केल्याचे  चौकशी दरम्यान मान्य केले. दरम्यान, सोने जप्त करण्यात आले असून दोन्ही प्रवाशांना सीमाशुल्क कायदा, १९६२ च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment