Thursday, January 22, 2026

Anmol Bishnoi : अनमोल बिश्नोईवर १० लाखांचे बक्षीस जाहीर

Anmol Bishnoi : अनमोल बिश्नोईवर १० लाखांचे बक्षीस जाहीर

नवी दिल्ली : कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) भाऊ अनमोल बिश्नोई (Anmol Bishnoi) याच्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने १० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. यासोबतच तपास यंत्रणेने २०२२ मध्ये एनआयएच्या दोन गुन्ह्यांमध्ये अनमोलविरुद्ध आरोपपत्रही दाखल केले आहे. मुंबई पोलिसांनी नुकतेच बाबा सिद्दीकी यांची हत्या करणारा शूटर अनमोल बिश्नोईच्या संपर्कात असल्याचे उघड केल्यावर एनआयएने ही कारवाई केली आहे.

लॉरेन्सचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई अमेरिकेत राहतो. तिथून तो लॉरेन्सच्या सांगण्यावरून गुन्हे करत असतो. पंजाबचा गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येप्रकरणीही अनमोल आरोपी आहे. गेल्या वर्षीही त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तो बनावट पासपोर्टवर भारतातून पळून गेला होता.

अनमोलवर २० गुन्हे दाखल आहेत. एवढेच नाही तर त्याने जोधपूर तुरुंगात शिक्षाही भोगली आहे. त्याची ७ ऑक्टोबर २०२१ रोजी सुटका झाली.

Comments
Add Comment