मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रचार खर्चासाठी एकूण २५२ वस्तूंची दरसुची जाहीर केली आहे. यांमध्ये चहा, कॉफी, पोहे, शाकाहारी थाळी, मांसाहारी थाळीच्या किमती देण्यात आल्या आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी याच दरानुसार खर्चाचा हिशेब ठेवण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाकडून हे दर निश्चित केले जातात.
शाकाहारी थाळी ७० रुपये, मांसाहारी थाळी १२० रुपये, पोहे, शिरा, उपमा १५ रुपये, चहा ८ रुपये अशा किमती ठरवण्यात आल्या आहेत. ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त खर्च केल्यास आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल उमेदवारांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळालेल्या उमेदवाराला प्रचारावर खर्च करण्यासाठी खर्चाची मर्यादा २८ लाखांवरून ४० लाख करण्यात आली आहे. या खर्चामध्ये जवळपास १२ लाखांनी वाढ करण्यात आली आहे. सभा, रॅली, जाहिरातीत्र यासारख्या प्रचाराच्या विविध माध्यमांवर उमेदवारांकडून निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो.