मुंबई: भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपाल हिने २४ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली. राणीने वयाच्या १४व्या वर्षी आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये पदार्पण केले होते. २९ वर्षीय राणीने भारतासाठी २५४ सामन्यांमध्ये २०५ गोल केलेत.
रिटायरमेंटची घोषणा करताना राणी भावूक झाली. राणी म्हणाली, खूप कठीण आहे, मात्र मला वाटते की हीच योग्य वेळ आहे हॉकीला अलविदा म्हणण्याची. तुमचे सगळ्यांचे आभार. तुम्ही खूप प्रेम दिले आणि ओळख दिली.
राणी कोण आहे हे स्वत:च स्वत: ओळखणे माझ्यासाठी कठीण होते. तुम्ही हॉकीवर असेच प्रेम करत राहा. अशा खूप राणी येणे बाकी आहे ज्यांना देशासाठी खूप काही करायचे आहे.
दुसरीकडे हॉकी इंडियाने राणी रामपालची जर्सी नंबर २८लाही रिटायर करण्याचा निर्णय घेतला आहे. राणीची प्रतिष्ठित नंबर २८ची जर्सी आता कोणत्याही महिला खेळाडूला दिली जाणार नाही.
हॉकी इंडियाकडून राणीला १० लाखांचे चेकही देण्यात आला. क्रीडा जगतात दिग्गज खेळाडूंची जर्सी रिटायर करणे ही काही नवी बाब नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून २०१७मध्ये महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरची १० नंबरची जर्सीही रिटायर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानंतर बीसीसीआयने २०२३मध्ये माजी भारतीय क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीची ७ नंबरची जर्सीला रिटायर केले होते. तर हॉकी इंडियाने गोलकीपर पीआर श्रीजेशची जर्सी नंबर १६ही रिटायर करण्याचा निर्णय घेतला होता. आता राणी रामपालला सचिन-धोनी-श्रीजेशसारखा सन्मान मिळाला आहे.