Saturday, May 10, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

सुरेश रैनाने खरेदी केली नवी Kia Carnival, किंमत आहे इतकी की...

सुरेश रैनाने खरेदी केली नवी Kia Carnival, किंमत आहे इतकी की...

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर सुरेश रैनाच्या घरी नवी गाडी आली आहे. त्याने किया कार्निवल लिमोजिन खरेदी केली आहे. सुरेश रैनाने गाडीची चावी घेतल्यानंतर केक कापत सेलिब्रेट केला. भारतात कियाची नवी कार या महिन्याच्या सुरूवातीला ३ ऑक्टोबरला लाँच झाली आहे.



Kia Carnivalचे फीचर्स


नवी किया कार्निवल दोन कलर रंगात भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे. ही एक ७ सीटर कार आहे. या कारमध्ये फ्यूजन ब्लॅक आणि ग्लेशियर व्हाईट पर्ल कलर देण्यात आला आहे. या गाडीचे इंटीरियर आणि Umber 2 टोन कलरसोबत येतो. या लक्झरी कारमध्ये वाईड इलेक्ट्रिक ड्युअल सनरूफही मिळते. गाडीमध्ये लोकांच्या एंटरटेनमेंटसाठी १२ स्पीकर बोस सिस्टीमही लावण्यात आला आहे.


कियाच्या कारमध्ये वायरलेस चार्जिंगचा ऑप्शन मिळतो. या गाडीमध्ये १८ इंचाच्या डायमंड कट अलॉय व्हील्स लागले आहेत. या कारमध्ये ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स चांगला बनवण्यासाठी पॅडल शिफ्टर्सही देण्यात आले आहेत. कियाच्या या कारमध्ये ADAS आणि ३६० डिग्री कॅमेरा फीचर देण्यात आला आहे. या कारमध्ये सेफ्टीसाठी ८ एअरबॅग्स देण्यात आले आहे.



इतकी आहे किंमत


ही नवी किया कार्निवल पेट्रोल आणि डिझेल पावरट्रेन सोबत मार्केटमध्ये आली आहे. या लक्झरी कारची एक्स शोरूम प्राईस ६३.९० लाख रूपये आहे.

Comments
Add Comment