मुंबई : दहावी बारावीच्या (SSC-HSC Exam) विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Education Department) घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक (Exam Timetable) जाहीर करण्यात आले आहे. याबाबतचे शिक्षण विभागाने प्रसिद्धी पत्रक देखील जारी केले आहे.
सध्या राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची सराव परीक्षा सुरू आहे. शिक्षण मंडळाच्या वेळापत्रकानुसार, दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून होणार असल्याची माहिती मिळत आहे.