पुणे : भोसरी येथील सद्गुरु नगरजवळ पाण्याची टाकी कोसळून मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या कामगारांवर अचानकपणे पाण्याची टाकी कोसळली. या घटनेत पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच, पोलिस आणि अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सध्या प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत.
दरम्यान, अचानक पाण्याची टाकी कोसळण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या घटनेमुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.तसेच प्रशासनाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली असून संबंधित कंत्राटदारावर कारवाई होण्याची शक्यता देखील वर्तण्यात येत आहे.