Thursday, December 12, 2024
Homeताज्या घडामोडीजम्मू-काश्मीर : LOCजवळ लष्कराच्या गाडीवर दहशतवादी हल्ला, २ जवान शहीद

जम्मू-काश्मीर : LOCजवळ लष्कराच्या गाडीवर दहशतवादी हल्ला, २ जवान शहीद

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीजवळ दहशतवादी हल्ल्याची बातमी समोर येत आहे. दहशतवाद्यांनी लष्कराच्या गाडीला निशाण बनवले. या हल्ल्यात २ जवान शहीद झाले आहेत. तर लष्करासाठी काम करणाऱ्या दोन मजूरांचाही यात मृत्यू झाला आहे. तर दोन जवान जखमी झाले आहेत.

एलओसीजवळ बोटापत्थर गुलमर्गच्या नागिन पोस्ट भागाजवळ लष्कराच्या गाडीवर हल्ला झाला. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हल्ल्यामध्ये एक दहशतवादीही जखमी झाला आहे. बारामुल्ला पोलिसांच्या माहितीनुसार जिल्ह्याच्या बोटापत्थर सेक्टरमध्ये नागिन पोस्टजवळ सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी घात लावत १८RR जवानांच्या वाहनावर हल्ला केला. थंडीचा मोसम येण्याआधीच दहशतवादी भारतीय सीमेमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -